सातारा : आपण अनेकदा भजन कीर्तन ऐकतो आणि पाहतो. मात्र, साताऱ्यातील कारागृहामध्ये ध्वज दिन निमित्ताने ध्वज सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कायद्यांसाठी घेण्यात आले आहेत. यातच एक कौतुकास्पद असा भजन किर्तनाचा उपक्रम कायद्यांसाठी राबवण्यात आला आहे. हा उपक्रम राबवण्यामागचा नेमका काय हेतू आहे, याचबाबत सातारा कारागृह अधीक्षक शामकांत शेगडे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कारागृह विभागाचे ब्रीद वाक्य “सुधारणा पुनर्वसन” हे आहे. कारागृहात दाखल झालेल्या व होणाऱ्या आरोपींना पुन्हा त्यांच्या कुटुंबात व समाजामध्ये सन्मानाने जगता यावे, यासाठी कारागृह विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतात. गुन्हा सिद्ध होऊन कारागृहात दाखल झालेल्या शिक्षा बंद्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विविध प्रशिक्षण देऊन त्या-त्या क्षेत्रामध्ये पारंगत करण्यात येते. यासोबतच त्यांना काम देऊन प्रशिक्षित करण्यात येते आणि त्या कामाचा त्यांना मोबदला म्हणून मजुरी देऊन शिक्षेमध्ये माफी देखील देण्यात येते.
कारागृहामधील महिला आणि पुरुष कैदींसाठी वेगवेगळे उपक्रम -
सातारा कारागृहात हॉलीबॉल स्पर्धा, कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा, महिलासाठी मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा कॅरम स्पर्धा आणि कीर्तन भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह. भ. प. लहू महाराज जाधव, पुणे यांचे किर्तन बंद्यांसाठी आयोजित करण्यात आले. लहू महाराज यांनी कैद्यांना “आता तरी पुढे हाची उपदेश l नका करू नाश आयुष्याचा l सकळांच्या पाया माझे दंडवत l आपुलले चित्त शुद्ध करा ll”, या सद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तन केले आणि सर्व कैद्यांना आयुष्याच्या सन्मार्गावर चालण्याचा उपदेश दिला.
मुंबईत ढोल पथकाच्या टीमचं कौतुकास्पद कार्य, पथनाट्याच्या माध्यमातून करताय जनजागृती, काय आहे विषय?
कारागृहामध्ये झालेल्या झालेल्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच तसेच ध्वज सप्ताह निमित्त कारागृहातील बंद्यांचे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचे प्रमाणपत्र व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम द्वितीय, तृतीय व सहभाग घेतलेल्या बंद्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कारागृह ध्वजदिन निमित्ताने कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा कारागृहामध्ये कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने “ध्वज सप्ताह” साजरा केला गेला. हा “ध्वज सप्ताह” साजरा करण्यासाठी समता फाउंडेशन, मुंबई यांचे बहुमूल्य मदत व सहकार्य मिळाले, असे सांगण्यात आले.