TRENDING:

कोल्हापूर, साताऱ्यात काँग्रेसचं आंदोलन स्थगित, NHAIने टोलमाफीबाबत घेतला मोठा निर्णय

Last Updated:

कोल्हापुरात किणी टोल नाक्यावर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन नॅशनल हायवे अथॉरिटीकडून अधिकाऱ्यांनी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर स्थगित करण्यात आलं

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर : पुण्याकडुन सातारा आणि पुढे कोल्हापुरला जाणा-या महामार्गाची दुरावस्था झाली असुन या ठिकाणी खड्ड्यांच साम्राज्य असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी खड्डे कमी दिसत असले तरी असलेले खड्डेच एवढे मोठे आहेत की त्यातून गाडी गेली तर टायर फुटुन मोठे अपघात होतायत. या महामार्गावर रोज अनेक गाड्यांचे नुकसान होत आहे. महामार्गांची अवस्था आणि आकारल्या जाणाऱ्या टोलविरोधात कोल्हापुरात किणी टोल नाक्यावर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन नॅशनल हायवे अथॉरिटीकडून अधिकाऱ्यांनी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर स्थगित करण्यात आलं. यानुसार २५ टक्के टोल माफ करण्यात आला असून उर्वरित २५ टक्के टोल माफ करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू असं नॅशनल हायवे अथॉरिटीने सांगितलं आहे.
News18
News18
advertisement

केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत NHAI वरिष्ठांच्या संपर्कात आहे. निवेदनातील मुद्द्यांमध्ये ५० टक्के टोलमाफी द्यावी यासाठी आम्ही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करत असल्याची माहिती NHAIने दिलीय. सद्या २५ टक्के टोलमाफी दिली असून उर्वरित टोलमाफीसाठी पाठपुरावा करू अशी माहिती NHAIने दिली आहे. किणी टोल नाक्याच्या २० किमी परिसरात जी गावे आहेत त्या गावातील खासगी वाहनांना १०० टक्के टोलमाफी असून त्यासाठी मासिक पास घ्यावे लागतील असंही NHAIकडून सांगण्यात आलंय. NHAIने आंदोलकांना त्यांचं आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केलं.

advertisement

महामार्गावर अनेक ठिकाणी सुमारे १ ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत. पावसात हे खड्डे न दिसल्यामुळं अनेक वाहनं या खड्यात आपटुन वाहनांचे टायर फुटत आहेत. वाहनांचे नुकसान होतंय तर अनेक छोटे मोठे अपघात यामुळं घडत आहेत. पुणे कोल्हापुर हा रस्ता अक्षरश: मृत्युचा सापळा बनला आहे. सरकारनं आणि NHAI नं याकडं लक्ष देवुन लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी वाहन चालक प्रवाशांनी केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

रस्ते वाहतुक मंत्रालय राज्य शासन आणि NHAI हे कधी या समस्येकडं लक्ष देणार हे पाहणे महत्वाचं आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होतात.  लवकरात लवकर महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
कोल्हापूर, साताऱ्यात काँग्रेसचं आंदोलन स्थगित, NHAIने टोलमाफीबाबत घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल