रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत होते. फलटण तालुक्याच्या राजकारणात माणिकराव सोनवलकर यांचा दबदबा आहे. त्यांनी ग्रामपंचायतीपासून ते सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत मजल मारलीय. आता सोनवलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं राजे गटाला खिंडार पडलं.
राजे गटातून माणिकराव सोनवलकर यांनी खासदार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. माणिकराव सोनवलकर यांच्या भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्चेकर हेसुद्धा उपस्थित होते. याचीही चर्चा साताऱ्यात होत आहे.
advertisement
माणिकराव सोनवलकर यांच्या भाजप प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माणिकराव सोवलकर साताऱ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भाजपमध्ये आलेत. जिल्हा परिषदेचे ते नेते असून ५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये सहभागी झाले.
