काय म्हणाले राहुल गांधी?
महाराष्ट्रातील सातारा येथे छळ सहन केल्यानंतर महिला डॉक्टर यांची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी एक शोकांतिका आहे. इतरांचं दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या एका हुशार डॉक्टरला भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी पडला, असं राहुल गांधी म्हणाले.
आत्महत्या नाही, संस्थात्मक हत्या - राहुल गांधी
advertisement
गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी या निष्पाप महिलेविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. बलात्कार आणि शोषण. वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. सत्तेने संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे, ही आत्महत्या नाही. ही संस्थात्मक हत्या आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे आम्ही उभा - राहुल गांधी
जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोण करू शकते? महिला डॉक्टर यांच्या मृत्यूने या भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आणला आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताच्या प्रत्येक मुलीसाठी आता भीती नाही, आम्हाला न्याय हवा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
दरम्यान, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळालं. त्यांनी यावेळी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
