उदयनराजे व भोसले कुटुंबांची एकूण संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये एवढी आहे. त्यामध्ये, उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे. दरम्यान, उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.
साताऱ्यात चुरस
शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवणं ही शरद पवारांची ही वेगळी चाल असल्याचं बोललं जातंय. पवारांनी अनेक गणितं आखुन शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे. शशिकांत शिंदे यांचा कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यात आहे, ही त्यांच्या जमेची बाजु आहे. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यात जावुन राष्ट्रवादी मजबुत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळं प्रत्येक तालुक्यात शशिकांत शिंदे यांना ओळखणारी लोकं आहेत. तसंच शशिकांत शिंदे हा संयमी चेहरा असुन शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातील सुद्धा आहेत. या बाजू खुप जमेच्या असुन उदयनराजे भोसले यांच्यासोबत लढण्यासाठी महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
वाचा - अमित ठाकरेंबद्दलची 'ती' बातमी खोटी, राज ठाकरेंनीच केला मोठा खुलासा
मागच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पावसातील एका सभेने निवडणूक फिलवली असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. येथून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील निवडून आले होते. या जागेवर आता शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपतर्फे पुन्हा एकदा उदयनराजे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.