अश्लील व्हिडीओ बनवले अन्...
कराड शहरातील महिला डॉक्टरसह एका सामाजिक कार्यकर्ता महिला, दोन डॉक्टर आणि एका युवक - युवतीची डिजिटल अप्लिकेशनचा वापर करून बनविले अश्लील व्हिडीओ पंजाब राज्यातून बनवून घेण्यात आलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरसह पंजाबमधील एका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सूत्रधार डॉक्टर असल्याचे समोर आले आहे.
advertisement
व्हॉटस् अॅप ग्रुपवर काय झालं?
मागील महिन्यात 20 मे रोजी एका युवतीला एका अनोळखी व्यक्ती व्हॉटस् अॅपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्या ग्रुपमध्ये 26 अन्य लोकांना समाविष्ट करण्यात आले होते. त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉटस् अॅप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि संबंधित महिला डॉक्टरशी ओळख सुद्धा नसणार्या अन्य एका डॉक्टरचे फोटो वापरून एक अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हिडीओ संबंधित ग्रुपवर पोस्ट करण्यात आला होता. त्याच कालावधीत या ग्रुपवर दुसरा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत अश्लील व्हिडीओ बनविण्यात आल्याचे दिसून आले.
साताऱ्यात खळबळ
विशेष म्हणजे व्हिडीओ बनविताना मजकूर, व्हिडीओला अश्लील भाषेतील आवाज सुद्धा जोडण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित युवतीने माहिती घेत ज्या - ज्या लोकांचे अश्लील व्हिडीओ बनविले आहेत, त्या सर्वाना शोधून काढत कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
दरम्यान, पंजाब राज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी कराडमधील एकाने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयिताकडून पोलिसांना सांगितले आहे. त्याचबरोबर संबंधिताचे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.