जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण
मुलाला मारहाण केल्यानंतर शाळेत शिक्षकांना जाब विचारण्यासाठी गेले असता आई-वडिलांना देखील आरोपींनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींमध्ये संचालक तुकाराम दादाराव मुंडे, आशा तुकाराम मुंडे, मुख्याध्यापक जस्सी जयस्वाल, क्रीडा शिक्षक प्रवीण वाघ याच्यासह एकाचा समावेश आहे. त्यामुळे सध्या साताऱ्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल
तुकाराम दादाराव मुंडे असं आरोप करण्यात आलेल्या एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थाचालकाचं नाव आहे. त्यासोबत पत्नीने आशाने देखील मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलचे क्रिडा शिक्षक प्रवीण वाघ यांच्यावर देखील मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
April 14, 2025 10:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Crime : साताऱ्यात मुख्याध्यापकाकडून मुलाचा छळ, जातिवाचक शिव्या; ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल