TRENDING:

वीरांच्या जिल्ह्यात शहिदांचं स्मारक, स्मृती उद्यानात 278 हुतात्म्यांना अनोखी मानवंदना, Video

Last Updated:

दिल्लीतील इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरिअल स्मारकाच्या धर्तीवर साताऱ्यात स्मृती उद्यान उभारलं जातंय. 14 गुंठे जागेत शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात येतेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोकडे, प्रतिनिधी
advertisement

सातारा: महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत अनेक वीरांनी हौतात्म्य पत्करलं. याच शहिदांच्या स्मृतीचं अनोखं स्मारक साताऱ्यात उभारण्यात आलंय. सातारा नगरपालिकेच्या वतीने शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात आलीय. सातारा जिल्ह्यातील ज्या सैनिकांनी देशसेवा करताना हौतात्म्य पत्करलं त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हे स्मृती उद्यान उभारल्याचं सांगण्यात येतंय.

advertisement

इथं घडले बाबासाहेब! आंबेडकरांची साताऱ्यातील शाळा पाहिली का? आजही घडतायेत विद्यार्थी, Video

278 शहिदांना अनोखी आदरांजली

दिल्लीतील इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरिअल स्मारकाच्या धर्तीवर साताऱ्यात स्मृती उद्यान उभारलं जातंय. 14 गुंठे जागेत शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात येतेय. पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत विविध युद्धांत शहीद झालेले जवान, त्यांचे नाव, कोणत्या युद्धात शहीद झाले? आणि शहीद झालेली तारीख अशी 278 जवानांची माहिती स्मारकात लावण्यात आलीय. या उद्यानात स्मृतिस्तंभ तसेच गोलाकार भिंतीवर 278 हुतात्मा जवानांच्या नावाची कोनशीला बसविण्यात आली आहे. कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 17 नोव्हेंबर 2015 मध्ये साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते 41 राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते.

advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा पाहिला आहे का? लोकेशन काय, संपूर्ण माहितीचा VIDEO

फायबर मिररची छायाचित्रे

पहिले महायुद्ध, भारत- पाक युद्ध, भारत-चीन युद्ध, कारगिल युद्ध यांसारख्या अनेक युद्धात 278 पेक्षा जास्त सैनिक शहीद झाले आहेत. या शहीद जवानांची माहिती ग्रॅनाईटमध्ये कोरून स्मृती उद्यानात दिली आहे. तसेच शहीद जवानांची छायाचित्रे फायबर मिररच्या माध्यमातून लावण्यात आली आहेत.

advertisement

शहीद सैनिकांचं पार्थिव स्मृती उद्यानात आणणार

शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानात आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींचं जतन करण्यात आलंय. तसेच यानंतर जिल्ह्यातील शहीद जवानांचं पार्थिव या स्मृती उद्यानात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच हे उद्यान लवकरच सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
वीरांच्या जिल्ह्यात शहिदांचं स्मारक, स्मृती उद्यानात 278 हुतात्म्यांना अनोखी मानवंदना, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल