TRENDING:

ज्याचं तिकीट जाहीर केलं, त्या आमदारानेच साथ सोडली, म्हणाले आमच्या दुखण्याचं दादांकडे औषध नाही!

Last Updated:

Phaltan MLA Deepak Chavan : महायुतीत ज्याचा आमदार त्याची जाहा असे अलिखित सूत्र ठरले असल्याने फलटणमधून पुन्हा एकदा आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवार मिळणार हे निश्चित होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फलटण : राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून मी पक्षाचे काम करतोय. मला २००९ ला संधी मिळाली तेव्हापासून मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतोय. शरद पवार यांच्या सोबतच काम करत होतो मात्र घरातच फूट पडल्याने निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा आम्ही अजित पवारांसोबत गेलो. कारण जेवढा आदर पवारसाहेबांबद्दल आहे तेवढाच आदार आम्हाला अजितदादांबद्दल आहे परंतु दादांकडे आमच्या आजाराचं औषध नाहीये, अशा शब्दात पक्ष सोडण्याचे कारण फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले. आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
अजित पवार आणि दीपक चव्हाण
अजित पवार आणि दीपक चव्हाण
advertisement

महायुतीत ज्याचा आमदार त्याची जाहा असे अलिखित सूत्र ठरले असल्याने फलटणमधून पुन्हा एकदा आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवार मिळणार हे निश्चित होते. परंतु दीपक चव्हाण यांच्या मनात बक्षबदलाविषयी चलबिचल सुरू होती. हेच हेरून अजित पवार यांनी थेट फोनवरून जनतेसमोर दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु उमेदवारी जाहीर केल्याच्या १५ दिवसांतच त्यांनी मनगटावरील घड्याळ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला.

advertisement

दीपक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी पक्षात कार्यकर्ता म्हणुन काम करतोय. पक्षाने मला २००९ ला फलटणमधून लढण्याची संधी दिली. तेव्हापासून आजपर्यंत फलटणचे प्रतिनिधित्व करतो आहे. मधल्या काळात जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा कुणाकडे जायचे हे धर्मसंकट आमच्यासमोर होते. तेव्हा आम्ही अजित पवारांसोबत गेलो. लोकांच्या विकासाच्या मागण्या होत्या. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रामराजेंच्या निर्णयामुळे आम्ही अजित पवारांसोबत गेलो. मात्र इथले स्थानिक भाजप नेतृत्व आणि आमच्यात प्रचंड मतभेद आहेत. राज्याच्या भाजप वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना ताकद मिळत आहे. त्याचा वापर करून स्थानिक नेतृत्व आमच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत आहेत. आमच्या या दुखण्यावर अजित पवार काहीच करु शकले नाहीत, असे दीपक चव्हाण म्हणाले.

advertisement

आमच्या अडचणी आम्ही अजित पवार यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यांच्याकडे आमच्या व्यथा आम्ही मांडल्या होत्या. त्यांनी आमच्या प्रश्नांची दखल का घेतली याची आम्हाला कल्पना नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

अजितदादांच्या पक्षाच्या मी राजीनामा मेल केला आहे. उद्या प्रत्यक्ष राजीनामा देणार आहे, असे त्यांनी सांगितले. तुमचा निर्णय पक्षाच्या अध्यक्षांना कळवला का? असे विचारले असता, आम्ही निर्णय घेतल्यानंतर अजित पवारांशी आमचे बोलणे नाही झाले किंबहुना फोनवरूनही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
ज्याचं तिकीट जाहीर केलं, त्या आमदारानेच साथ सोडली, म्हणाले आमच्या दुखण्याचं दादांकडे औषध नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल