घटनेबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वरवरून पलुसला निघालेल्या एसटी बसचा बुधवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा जिल्ह्यातील भुईजमध्ये हा अपघात झाला. एसटी बसनं दुचाकीला धडक दिली, हा अपघात इतका भीषण होता की या अपघातानंतर बसनं पेट घेतला. या आगीत होरपळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्यानंतर आग नियंत्रणात न आल्यानं बस देखील जळून खाक झाली आहे. या अपघातात मृत्यू झालेला तरुण कराड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
दरम्यान या अपघाताचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे, बसनं दुचाकीला उडवलं त्यानंतर बसला आग लागली. या आगीमध्ये दुचाकीस्वाराचा होरपाळून मृत्यू झाला तर त्यानंतर बस देखील जळून खाक झाली आहे.
advertisement
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
August 15, 2024 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
मोठी बातमी! भीषण आगीत एसटी बस जळून खाक; साताऱ्यात मोठी दुर्घटना, अपघाताचा Video
