TRENDING:

सातारा जिल्ह्यातून भाजपची ३ तिकीटे कुणाला? एका उमेदवाराला उदयनराजेंची 'झप्पी'

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात भाजपाची तिकीटे कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळतीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोज घोरपडेंना जादू की झप्पी दिल्याने कराड उत्तर मतदारसंघातून भाजपाचे तिकीट फायनल झाल्याच्या चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहेत. उदयनराजे भोसले यांनी मनोज घोरपडे यांना भेटून उमेदवारी मिळाल्याच्या शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात येते.
उदयनराजे भोसले आणि मनोज घोरपडे
उदयनराजे भोसले आणि मनोज घोरपडे
advertisement

सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात भाजपाची तिकीटे कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळतीये. सातारा विधानसभेतून शिवेंद्रराजे भोसले, कराड दक्षिणमधून अतुल भोसले तर कराड उत्तरमधून मनोज घोरपडे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.दुसरीकडे माण-खटाव मतदारसंघातून जयकुमार गोरे यांनाच भाजपाचे तिकीट मिळणार आहे. त्यांची उमेदवारी पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत घोषित होईल, असेही बोलले जाते.

advertisement

उदयनराजे भोसले यांनी मनोज घोरपडे यांना भेटून त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या शुभेच्छांनंतर मनोज घोरपडे हे भाजपाचे कराड उत्तर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार फिक्स झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

भाजपने 2019 ला धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी घोरपडे यांनी बंडखोरी केले होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवली होती. कदम आणि घोरपडे यांना बाळासाहेब पाटील यांनी पराभूत केले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब पाटील यांनी सहकारमंत्री म्हणून काम पाहिले.

advertisement

समाजवादी पक्षाकडून पाच उमेदवारांची घोषणा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळ्यातील जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मुंबईतील मानखुर्दमधून अबू आजमी तर भिवंडी पूर्वमधून रईस शेख यांच्या नावांचा समावेश आहे. सध्याच्या विधानसभेमध्ये अबू आजमी आणि रईस शेख हे विद्यमान आमदार आहेत.

advertisement

मानखुर्दमधून अबू आजमी

भिवंडी पूर्व रईस शेख

भिवंडी पश्चिम रियाज आजमी

मालेगाव शाने हिंद निहाल अहमद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

धुळ्यातून इरशाद जहागिरदार

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
सातारा जिल्ह्यातून भाजपची ३ तिकीटे कुणाला? एका उमेदवाराला उदयनराजेंची 'झप्पी'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल