इंदिरानगरमधील सुमारे 772 नागरिकांच्या पोकळी हिस्सा नोंदी पुढील तीन दिवसात युद्ध पातळीवर पूर्ण करतील. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वापरून, नोंदणी महानिरीक्षक सर्व नोंदी पूर्ण करतील, असे महसूल मंत्री यांनी स्पष्ट केले. संगमनेरमधील प्रलंबित मालमत्ता नोंदणी प्रश्न खूप गंभीर आहे. उपनिबंधक नागरिकांशी अरेरावीची भाषा करतात. राजकीय हेतूने जाणीवपूर्वक नोंदी घेण्यास टाळाटाळ करतात असे नमूद करत सत्यजीत तांबे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी आमदार तांबे यांच्या प्रश्नाची दखल घेतली. उपनिबंधकाच्या बदलीच्या आदेशानंतर नोंदणी महानिरीक्षक यांना पुढील तीन दिवसात संगमनेरला जाऊन संबंधित प्रकरणाच्या चौकशीचा आदेशही मंत्री बावनकुळे यांनी दिला.
advertisement
संगमनेरच्या इंदिरानगरमधील रहिवाशांच्या घराच्या नोंदणीचा अनेक वर्षापासून प्रश्न आहे. या संदर्भात आमदार सत्यजीत तांबे गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात त्यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा लक्षवेधीची गंभीर दखल घेतली.
इंदिरानगरनंतर मालदड रस्ता आरक्षणाचाही प्रश्न मार्गी?
इंदिरानगरचा जुना प्रश्न सुटण्याची वाट मोकळी झाल्यानंतर, मालदड रस्त्यावरील भाजीपाला मार्केट, मैदान आणि शैक्षणिक प्रकल्पांसाठी राखीव जागांबाबतचा तिढाही लवकर सुटेल, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.
