'तुम्ही आम्हाला मत दिलंत तर तुम्हाला रामलल्लाचं दर्शन मोफत करून देऊ, असं म्हणाले. रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का? किती वर्षांपासून जय श्रीकृष्ण, जय श्रीराम हे कित्येक वर्षांपासून चालत आलंय. तुम्ही आता आलात आणि तुम्हाला असं वाटतंय की जय श्रीराम आणि बजरंग बली की जय म्हणलं तर सगळे हिंदू आपल्यासोबत येतील. हाच त्यांचं हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वातला फरक आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
'8-10 दिवसांपूर्वी पंतप्रधान गुजरातला गेले होते, मुंबईहून सगळे उद्योग गुजरातला नेत आहेत. आमच्यासोबत जे गुजराती राहत आहेत, ते पुन्हा सुरतला जातील? गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, का महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का? उत्तर प्रदेश मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
'हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदूंविरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान म्हणतात तसं मी तुम्हाला सांगतो, निवडणूक आली की जय श्रीराम, जय श्रीकृष्ण म्हणा आणि तानाशाही संपवा,' असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं.