स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट कॅडेअर ऑफिसर’पदासाठी रेग्युलर बेस पदांवर भरती सुरू आहे. ही भरती 08 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 28 ऑक्टोबरपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 आहे. sbi.bank.in या वेबसाईटवर जाऊन अर्जदार अर्ज करू शकता. अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. बँकेत डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 3 पदांसाठी भरती केली जाणार असून MMGS-II ग्रेडसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
advertisement
‘स्पेशलिस्ट कॅडेअर ऑफिसर’ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांपर्यंतची आहे. नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्ट लिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. नोकरीसाठी तुम्हाला 64,820 ते 93,960 रुपये पगार मिळणार आहे. बँकेतल्या ह्या नोकरीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्राची मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. याच सोबत इकोनॉमिमेट्रिक्स/ मॅथेमॅटिकल इकोनॉमिक्स/ फायनान्शियल इकोनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात.