नेमकं प्रकरण काय?
कळमनुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेत ११ वर्षीय पीडित मुलगी निवासी राहून शिक्षण घेत आहे. पीडित मुलीने याबाबत १५ ऑक्टोबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास 'पटवे' नावाच्या शिक्षकाने तिला ऑफिसमध्ये एकटीलाच जेवण करण्यासाठी बोलावले.
यावेळी जेवण झाल्यानंतर शिक्षक पटवे याने त्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने पीडित मुलीने याबाबत आश्रमशाळेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी ही गंभीर घटना उघड होऊ नये, यासाठी ती दडपण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.
advertisement
अखेरीस, पीडित मुलीने धाडस करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक पटवे याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणि अधीक्षकावर माहिती दडवून गुन्ह्यात सहकार्य केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने आश्रमशाळेच्या अधीक्षकाला अटक केली असून, फरार झालेल्या शिक्षकाचा कसून शोध घेत आहेत.