TRENDING:

SEBI Recruitment 2025: टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! 110 पदांसाठी संधी; तब्बल 1,84,000 असेल पगार

Last Updated:

सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सेबीमध्ये 'अधिकारी ग्रेड ए' (सहाय्यक व्यवस्थापक) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सेबी अर्थातच भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वी नोकरभरतीची घोषणा केली होती. आता त्याच नोकरभरतीला आता सुरूवात झाली आहे. कोणकोणत्या पदांसाठी सेबीमध्ये नोकरभरती होणार आहे, एकूण जागा किती असणार आहेत आणि अर्जप्रक्रियेला केव्हापासून सुरूवात होणार आहे? जाणून घेऊया...
SEBI Recruitment 2025: टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! 110 पदांसाठी संधी; तब्बल 1,84,000 असेल पगार
SEBI Recruitment 2025: टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! 110 पदांसाठी संधी; तब्बल 1,84,000 असेल पगार
advertisement

सेबीमध्ये 'अधिकारी ग्रेड ए' (सहाय्यक व्यवस्थापक) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट मॅनेजर (General), असिस्टंट मॅनेजर (Legal), असिस्टंट मॅनेजर (IT), असिस्टंट मॅनेजर (Research), असिस्टंट मॅनेजर (Official Language), असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) आणि असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) या विविध विभागांमध्ये रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. ही भरती एकूण 110 रिक्त जागांसाठी होत आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून ऑनलाईन अर्ज आणि अर्ज शुल्क भरण्यासाठीची शेवटची तारीख एकच आहे.

advertisement

30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2025 आहे. असिस्टंट मॅनेजर (General) पदासाठी 56 जागा, असिस्टंट मॅनेजर (Legal) पदासाठी 20 जागा, असिस्टंट मॅनेजर (IT) पदासाठी 22 जागा, असिस्टंट मॅनेजर (Research) पदासाठी 4 जागा, असिस्टंट मॅनेजर (Official Language) पदासाठी 3 जागा, असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) पदासाठी 2 जागा आणि असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) पदासाठी 3 जागांवर नोकर भरती केली जात आहे. या विविध विभागांमध्ये पदांसमोर नमूद करण्यात आलेल्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. सेबीच्या भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक बातमीमध्ये देण्यात आली आहे.

advertisement

SEBI Grade A Notification 2025 Official PDF: सेबी भरती नोटिफिकेशन पीडीएफ- https://drive.google.com/file/d/1s0COOD0hHCGsUinE82BcJgv5PEZtkIVK/view

SEBI Grade A Online Form Link 2025: सेबी भरती ऑनलाईन अर्जप्रक्रियेची लिंक- https://ibpsreg.ibps.in/sebisep25/

सविस्तर माहितीसाठी अर्जदारांनी बातमीमध्ये दिलेली जाहिरात एकदा आवश्य वाचावी. ती वाचूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच अर्जदाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1995 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. सेबीने घालून दिलेल्या नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. खुला प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग श्रेणीसाठी, अर्ज शुल्क आणि सूचना शुल्कासह 18% जीएसटी मिळून 1000 रुपये शुल्क असेल. अनुसूचित जाती- जमाती आणि शारिरीक दृष्ट्‍या दुर्बळ उमेदवारांसाठी, सूचना शुल्कासह 18% जीएसटी मिळून 100 रुपये शुल्क असेल. अर्जदारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा शुल्क दिले जाणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनची नाफेड नोंदणी आता करा मोबाईल वरून, या सोप्या स्टेप करा फाॅलो, Video
सर्व पहा

सेबीमध्ये ग्रेड 'ए' अधिकारी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना त्यांना दोन वर्षांचा परिविक्षाधीन (Probationary) कालावधी पूर्ण करावा लागेल. ग्रेड ए अधिकाऱ्यांसाठी वेतनश्रेणी ₹62,500- 3600 (4)- 76,900- 4050 (7)- 1,05,250 EB- 4050 (4)- 1,20,450- 4650 (1)- 1,26,100 अशी १७ वर्षांसाठी आहे. या वेतनश्रेणीच्या किमान स्तरावर, राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) सेबीचे योगदान, ग्रेड अलाउन्स, स्पेशल अलाउन्स, महागाई भत्ता, फॅमिली अलाउन्स, लोकल अलाउन्स, लर्निंग अलाउन्स आणि स्पेशल ग्रेड अलाउन्स यांचा समावेश करून, मुंबईत निवासस्थानाशिवाय अंदाजे 1,84,000 रुपये प्रति महिना आणि निवासस्थानासह 1,43,000 रुपये प्रति महिना एकूण वेतन मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SEBI Recruitment 2025: टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! 110 पदांसाठी संधी; तब्बल 1,84,000 असेल पगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल