मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (23), मोहम्मद अनस मोहम्मद सईद (22), अब्दुल अवेज मोहम्मद अकील (23) आणि मोहम्मद अनवेज अब्दुल सलीम (23) अशी मृतांची नावे आहेत. तर मोहम्मद हुजेफा (22), मोहम्मद अशर (21) आणि मोहम्मद अनस (24) हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एक चहासाठी निघालेल्या सात मित्रांसोबत घात झाला. आठ दिवसांपूर्वी मोहम्मद आशर इरशाद अहमद याने नवी कोरी घेतली होती. नवीन गाडीचा आनंद मित्रांसोबत शेअर करण्यासाठी रात्रीचा चहाचा प्लॅन ठरवला. सातही मित्र अकोला महामार्गावरील नाक्याकडे निघाले होते. मात्र काळाने वाटेतच घाला घातला. तीन मित्रांनी डोळ्यासमोर आपल्या चार मित्रांना तडफडून जीव सोडताना पाहिलं. तर तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
एका चहामुळे कायमची सुटली 7 मित्रांची साथ, काळानं गाठलं अन् चौघांचा डोळ्यासमोर तडफडून मृत्यू
मोहम्मद आशर इरशाद अहमद सुदैवानं कार अपघातात बचावला मात्र तो जखमी झाला आहे. जुनी वस्तीतील जुन्या कब्रस्तान परिसरात मृत चार मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अब्दुल सलीम हा डी फार्मचे शिक्षण घेत होता. मोहम्मद तलहा आणि मोहम्मद अवेज, मोहम्मद अनस हे तिघेही उच्च शिक्षण घेत होते. या चौघांची कौटुंबिक स्थिती म्हणावी तशी फार चांगली नव्हती. घरचा मोठा आधार हरपल्याची भावाना कुटुंबियांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिली आणि कार तीनदा पलटली. यामध्ये चौघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात हसत्या खेळत्या चार मित्रांचा प्रवास कायमचा थांबला. मागे फक्त आठवणी राहिला. अंगावर काटा आणणारा हा भीषण अपघात होता. गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. चार मित्रांसोबत पुन्हा कधीच चहा घेता येणार नाही. चहा बघितल्यानंतर नेहमी त्यांची आठवण येत राहील अशी जखमी तीन मित्रांची भावना आहे. जीवभावाचे मित्र कायमचे दुरावले.
