TRENDING:

सुट्टीला घरी आलेली 13 वर्षीय लेक; बापानेच केलं गरोदर अन्..., धक्कादायक घटनेनं चंद्रपूर हादरलं

Last Updated:

पैसे कमावण्यासाठी या व्यक्तीची पत्नी एप्रिल महिन्यात कामासाठी दुसऱ्या राज्यात गेली होती. याच काळात मुलीच्या शाळेला सुट्टी लागली आणि ती आश्रम शाळेतून घरी परतली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
minor
अल्पवयीन मुलीवर अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

चंद्रपूर : चंद्रपूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यात एक 13 वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आश्रम शाळेतून आपल्या घरी परतली होती. मात्र, इथे बापानेच पोटच्या मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. बापाने धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

advertisement

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावातील आहे. या गावाता पती, पत्नी आणि दोनं मुलं राहतात. पोट भरण्याकरता पैसे कमावण्यासाठी या व्यक्तीची पत्नी एप्रिल महिन्यात कामासाठी दुसऱ्या राज्यात गेली होती. याच काळात मुलीच्या शाळेला सुट्टी लागली आणि ती आश्रम शाळेतून घरी परतली. इथे पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत बापानेच मुलीवर बलात्कार केला.

advertisement

कारमध्ये पत्नी आणि गर्लफ्रेंड दोघींना घेऊन बसलेला तरुण; पुढे घडलं असं काही की पोलीसही चक्रावले

हा राक्षस बाप मुलीला धमकी देत वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता आणि तिला शांत राहण्यास सांगत होता. काही दिवसांनी मुलीची शाळा पुन्हा सुरू झाली आणि ती शाळेसाठी परतली. यावेळी शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली.

advertisement

मुलीची चौकशी केल्यावर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. यानंतर शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरुन नागभीड पोलिसांनी आऱोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुट्टीला घरी आलेली 13 वर्षीय लेक; बापानेच केलं गरोदर अन्..., धक्कादायक घटनेनं चंद्रपूर हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल