advertisement

कारमध्ये पत्नी आणि गर्लफ्रेंड दोघींना घेऊन बसलेला तरुण; पुढे घडलं असं काही की पोलीसही चक्रावले

Last Updated:

जखमी अवस्थेत गाडीतून बाहेर आल्यानंतर मुलगी मदत मागण्यासाठी रस्त्यावर धावू लागली. त्यानंतर त्या व्यक्तीने तिच्या डोक्यावर मागून काठीने अनेक वार केले

कारमध्येच घडलं भयंकर (प्रतिकात्मक फोटो)
कारमध्येच घडलं भयंकर (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ : एका विवाहित पुरुषाने आपल्याच गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नराधमाने आधी कारमध्ये प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. जखमी अवस्थेत गाडीतून बाहेर आल्यानंतर मुलगी मदत मागण्यासाठी रस्त्यावर धावू लागली. त्यानंतर त्या व्यक्तीने तिच्या डोक्यावर मागून काठीने अनेक वार केले. यामुळे मुलीचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी त्या व्यक्तीची पत्नीही त्याच्यासोबत होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची पत्नी अद्याप फरार आहे. घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमधील आहे.
हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. किराणा व्यवसाय करणाऱ्या पवन गुप्ता नावाच्या व्यक्तीचे गेल्या तीन वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तरुणीने त्याच्याकडून काहीही मागितलं तरी पवन तिची प्रत्येक मागणी पूर्ण करायचा. मात्र, काही काळापूर्वी व्यावसायिकाच्या पत्नीला याची माहिती मिळाली. घरात बराच गदारोळ झाला. किराणा व्यापाऱ्याने पत्नीला वचन दिलं, की तो मुलीशी कधीही बोलणार नाही.
advertisement
पण दुसरीकडे प्रेयसीला हे नातं संपवायचं नव्हतं. म्हणूनच ती रोज त्याला भेटायला जायची. पवन गुप्ता पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याने प्रेयसीला सोमवारी भेटण्यास बोलवलं. त्याची गर्लफ्रेंड त्याला भेटायला आली. ती गाडीत बसताच व्यावसायिकाची पत्नी तिथे आधीच बसलेली होती. व्यावसायिकाने आपल्या गर्लफ्रेंडला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती.
advertisement
व्यावसायिकाने सांगितलं- 'मी कारमध्ये माझ्या गर्लफ्रेंडला समजावून सांगत होतो, तेव्हा तिने भांडण सुरू केलं. ती मला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देऊ लागली. त्यामुळे माझ्या पत्नीने तिला चापट मारली. प्रेयसी आणि पत्नीमध्ये भांडण सुरू झालं. मला राग आल्यावर मी माझ्या गर्लफ्रेंडच्या हातावर काठीने मारलं. तिला दुखापत झाल्यावर ती गाडीतून बाहेर आली आणि पळू लागली. मग मी तिच्या मागे गेलो आणि तिच्या डोक्यावर अनेक वार केले. यामुळे तिचा तिथेच मृत्यू झाला. मग आम्ही तिथून पळ काढला.'
advertisement
मुलीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह सापडला. मोबाईल डिटेल्सवरून समोर आलं की, मुलीचं शेवटचं किराणा व्यावसायिकाशी बोलणं झालं होतं. पोलिसांनी सांगितलं, की आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. व्यावसायिकाची पत्नी अद्याप फरार आहे. तिचा शोध सुरू आहे. लवकरच तिलाही अटक करण्यात येईल.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
कारमध्ये पत्नी आणि गर्लफ्रेंड दोघींना घेऊन बसलेला तरुण; पुढे घडलं असं काही की पोलीसही चक्रावले
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement