रेल्वे गाड्या रद्द होण्याची कारणे आणि परिणाम
रेल्वे स्थानकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी हे यार्ड रिमॉडेलिंगचे काम करणार आहेत. या कामासाठी लागणाऱ्या वेळेमुळे वाहतूक थांबवावी लागते. परिणामी, नोव्हेंबर महिन्याच्या महत्त्वाच्या तारखांना भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार प्रमुख एक्सप्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक,गाडीचे नाव,रद्दची तारीख
१८०२९,लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - शालिमार एक्सप्रेस,१३ ते १९, २२ आणि २३ नोव्हेंबर
advertisement
१८०३०,शालिमार - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) एक्सप्रेस, १३ ते २१ नोव्हेंबर
१२१५१,लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - शालिमार एक्स्प्रेस, १२, १३ आणि १९ नोव्हेंबर
१२१५२,शालिमार - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) एक्स्प्रेस, १४, १५ आणि २१ नोव्हेंबर
ज्या प्रवाशांनी या गाड्यांमध्ये आधीच आपले आरक्षण केले आहे, त्यांची या निर्णयामुळे मोठी अडचण होणार आहे. त्यांना आपला प्रवास रद्द करावा लागू शकतो किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागेल. ज्या गाड्या रद्द झाल्या आहेत त्याचे रिफंड घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय ज्या गाड्या रिशेड्युल झाल्या आहेत त्याची माहिती देखील घ्यावी.
या गाड्या मार्गातच थांबणार
रद्द केलेल्या गाड्यांव्यतिरिक्त, भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्या त्यांच्या नियोजित अंतिम स्थानकापर्यंत न जाता, मार्गातच एका दुसऱ्या स्थानकावर 'शॉर्ट टर्मिनेट' केल्या जातील किंवा दुसऱ्या स्थानकावरून त्यांचा प्रवास सुरू करतील. यामुळे या गाड्यांचा संपूर्ण प्रवास पूर्ण होणार नाही.
१२१०९ LTT - शालिमार एक्स्प्रेस: ही गाडी १८ नोव्हेंबर रोजी शालिमारपर्यंत न जाता, संत्रागाची येथेच थांबेल.
१२१०२ शालिमार - LTT एक्स्प्रेस: ही गाडी २० नोव्हेंबर रोजी शालिमारऐवजी संत्रागाची येथून नियोजित वेळेत आपल्या प्रवासाला सुरुवात करेल.
१२९०५ पोरबंदर - शालिमार: ही गाडी १९ नोव्हेंबर रोजी संत्रागाची येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
१२९०६ शालिमार - पोरबंदर: ही गाडी २१ नोव्हेंबर रोजी शालिमारऐवजी संत्रागाची येथून नियोजित वेळेनुसार सुटेल.
