TRENDING:

NCP Sharad Pawar: कोल्हापूर ते नाशिक... पवारांच्या राष्ट्रवादीचा सुफडा साफ! या १८ शहरांची यादी पाहून बसेल धक्का, बालेकिल्लाही ढासळला

Last Updated:

Sharad Pawar : . महायुतीच्या झंझावातात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच हाती आले असून, या निकालांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महायुतीच्या झंझावातात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील तब्बल १८ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये पक्षाला आपला भोपळाही फोडता आलेला नाही, ज्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोल्हापूर ते नाशिक... पवारांच्या राष्ट्रवादीचा सुफडा साफ! या १८ शहरांची यादी पाहून बसेल धक्का, बालेकिल्लाही ढासळला
कोल्हापूर ते नाशिक... पवारांच्या राष्ट्रवादीचा सुफडा साफ! या १८ शहरांची यादी पाहून बसेल धक्का, बालेकिल्लाही ढासळला
advertisement

मुंबई महानगर क्षेत्रात सपशेल पराभव

मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) राजकारण नेहमीच चुरशीचे असते. मात्र, यावेळी शरद पवार यांच्या पक्षाला या भागात मोठी किंमत मोजावी लागली आहे. नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या भागात पक्षाची ताकद कमी झाल्याचे चित्र निकालांवरून स्पष्ट दिसत आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीत लढताना पवारांच्या राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला.

advertisement

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही निराशा

उत्तर महाराष्ट्रात जिथे पक्षाची मोठी फळी होती, तिथेही पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. नाशिक, मालेगाव, धुळे आणि जळगाव या चारही प्रमुख शहरांमध्ये पक्षाला खाते उघडण्यात अपयश आले. विदर्भातील परिस्थितीही वेगळी नव्हती. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरसह अमरावती आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादीला यश मिळवता आले नाही.

बालेकिल्ल्यांना भगदाड?

advertisement

सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि इचलकरंजी या महापालिकांमध्ये पक्षाची पाटी कोरीच राहिली. मराठवाड्यातही नांदेड-वाघाळा, परभणी आणि जालना या शहरांनी पवारांच्या पक्षाला नाकारल्याचे पाहायला मिळत आहे.

निकालाचा परिणाम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

हे निकाल शरद पवार गटासाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. महायुतीच्या वाढत्या प्रभावामुळे आणि पक्षांतर्गत झालेल्या फुटीमुळे मतदारांनी पवारांच्या पक्षाकडे पाठ फिरवली का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. १८ शहरांमधील हा 'भोपळा' पक्षाच्या आगामी रणनीतीवर मोठा परिणाम करण्याची शक्यता आहे.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Sharad Pawar: कोल्हापूर ते नाशिक... पवारांच्या राष्ट्रवादीचा सुफडा साफ! या १८ शहरांची यादी पाहून बसेल धक्का, बालेकिल्लाही ढासळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल