यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली. यावेळी पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबीय देखील उपस्थित होते. पवार कुटुंबात जवळपास अर्धा ते पाऊण तास बैठक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
advertisement
शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात विलिनीकरणावर चर्चा?
सत्तासंघर्षामुळे कुटुंबात फूट पडली, हे बरे नाही. काकांच्या डोळ्यादेखतच दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, अशी अच्छा अजित पवार यांनी त्यांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. केवळ इच्छा व्यक्त करून ते थांबले नाही, तर शरद पवार यांच्याशी बोलून त्यांनी त्यासंदर्भातील पुढची पावले टाकायलाही सुरुवात केली. एकत्रिकरणाचा पहिला टप्पा म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले. परंतु अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या भूमिकेमुळे एकत्रिकरणाला खीळ बसल्याची चर्चा आहे. याचसंदर्भाने शरद पवार यांनी आज सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
थरथरत्या हातांनी शरद पवारांचा दादांना नमस्कार
सहयोग सोसायटीतील निवासस्थानाच्या समोर अजित पवार यांचा पुष्पहार घातलेला भलामोठा फोटो लावण्यात आला आहे. शरद पवार यांनी पुष्प वाहून दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. ज्यावेळी अजित पवार यांचे दर्शन घेण्याकरिता त्यांनी हात जोडले त्यावेळी पवार कुटुंबातले सगळेच भावुक झाले. सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. अजित पवार यांच्या भगिनी देखील हुंदक्यांनी दाटल्या. पवार कुटुंबातल्या जावा देखील भावनिक झाल्या होत्या. पवार कुटुंबातल्या या हळव्या क्षणांनी उपस्थित सगळेच भावुक झाले.
