काय म्हणाले शरद पवार?
प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून 'मार्मिक' भाष्य केले. कुशल संघटक व मुत्सद्दी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, अशी पोस्ट शरद पवारांनी केली आहे.
advertisement
शिवसेना vs शिवसेना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना ठाकरे गटाने टीझर प्रसिद्ध केला आहे. या टिझरमध्ये आम्हीच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं दाखवण्यात आलंय. तर कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. आम्ही जपले बाळासाहेबांचे विचार, असे बॅनर मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात लावण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यात टिझर आणि होर्डिंग वॅार सुरू झालंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.