इस्त्रोत काम करणारा माजी अधिकारी
चार एप्रिल रोजी जेव्हा शिर्डी पोलीसांनी भिक्षेकऱ्यांवर कारवाई करत पोलीस ठाण्यात आणलं. त्यावेळी त्यातील एकजण इस्त्रो या संशोधन केंद्रात काम करणारा माजी अधिकारी असल्याचं दिसतंय. केएस नारायणन नाव असलेले हे व्यक्ती अतीशय सहजतेने इंग्लिश मध्ये संवाद साधत होते. 2008 साली इस्त्रोतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचं सांगत होते. मंदिराच्या चार नंबर गेटसमोर भिक्षेकऱ्यांसोबत बसलेल्या या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र नंतर लेखी घेऊन त्यांना त्याच दिवशी सोडून देण्यात आलं.
advertisement
शिर्डीत भिक्षेकऱ्यांमध्ये निवृत्त फौजदार, उच्चशिक्षित तरुण
पोलिसांच्या कारवाईतील भिक्षेकऱ्यांमध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार (Retired Assistant Sub-Inspector), अस्खलित इंग्रजी बोलणारा एक उच्चशिक्षित तरुण आणि कर्ज फेडण्यासाठी भीक मागणारी एक महिला देखील सापडली. त्यामुळे पोलिसांना देखील डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
साई मंदिर परिसरातील 75 भिक्षेकरी ताब्यात
दरम्यान, गुरुवारी सकाळपासून शिर्डी पोलिस, साई संस्थान आणि नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून साई मंदिर परिसरातील 75 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले. हे भिक्षेकरी सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करत होते आणि काही मद्यधुंद अवस्थेत भाविकांना त्रास देत असल्याचे निदर्शनास आले. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.