शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येत असतात. मात्र, अनेक वेळा दर्शनासाठी येताना किंवा परत जात असताना भाविकांना छोट्या-मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर साई संस्थानने गुढी पाडव्याच्या दिवशी साईभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय .आता साईभक्तांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय शिर्डीतील साई संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.
advertisement
साईबाबा संस्थानने हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांना ही मोठी भेट दिली आहे. देशभरातून शिर्डीत येणा-या भाविकांना ही योजना मोठा दिलासा देणारी ठरणार असून शिर्डीत विमानाने, रेल्वेने , गाडीने किंवा पायी येत असताना जर कुठला अपघात झाला तर उपचाराचा खर्च किंवा मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये मिळणार आहेत..
शिर्डीच्या साईमंदिरात व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा दर्शन रांगा थांबवल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. साईबाबा संस्थानने तिरुपतीच्या धर्तीवर व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंतच दर्शनाची व्यवस्था करता येईल का? याबाबत विचार करावा अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे. शिर्डीच्या साईमंदिरात व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा दर्शन रांगा थांबवल्या जातात त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. साईबाबा संस्थानने तिरुपतीच्या धर्तीवर व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंतच दर्शनाची व्यवस्था करता येईल का? याबाबत विचार करावा अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे.. व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास सर्वसामान्यांना दिवसभरात सुकर दर्शन घेता येईल असं विखे यांनी म्हटलंय..