साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत असले तरी, धमकीच्या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी देखील साई संस्थानला धमकीचे ईमेल आल्याच्या घटना घडल्या होत्या आणि त्यातील बहुतेक पत्रे किंवा ईमेल बनावट ठरले होते.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आधीच तणावाचे वातावरण असताना, साई संस्थानला पुन्हा धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा केवळ खोडसाळपणा आहे की यामागे आणखी काही गंभीर कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सध्या साई मंदिर आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. भाविकांमध्ये मात्र या धमकीमुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.