उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करीत आदित्य ठाकरे म्हणाले, हा फोटो- फक्त उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र उभे आहेत एवढाच नाहीये, ह्यापेक्षा जरा अधिक खास आहे! मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या प्रचारसभेत मी बोलेन किंवा नाही हे नक्की नव्हतं कारण दोन दिग्गज नेते सभेला संबोधित करणार असताना एवढा वेळही असेल का ह्याबद्दल शंकाच होती.
advertisement
भाषणासाठी माझे नाव जाहीर झाले, आणि ते दोघे घाईघाईने गच्चीवर आले
पण माझे नाव जाहीर झालं आणि मी भाषणाला उभा राहिलो. त्यावेळी माझे बाबा आणि काका (राज ठाकरे-आदित्य ठाकरे) दोघांनाही मी भाषण करणार आहे ह्याची कल्पना नव्हती. पण माझे नाव जाहीर होताच काकाच्या घरी असलेले ते दोघेही घाईघाईत गच्चीवर आले आणि तिथून माझा जाहीर संवाद ऐकू लागले.
त्या दोघांसमोर भाषण कसं करणार होतो?
मला ह्याबद्दल तेव्हा कल्पना नव्हती आणि नव्हती हेच बरंय, कारण त्या दोघांसारख्या उत्तम वक्त्यांसमोर भाषण? कसं करणार? पण तो क्षण छायाचित्रात टिपला जाणं हे माझ्यासाठी खास आहे. ह्या अमूल्य क्षणासाठी अवी गोवारीकर ह्यांचे आभार, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
