मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शिवसेना शिंदे गटाचे नगर परिषद निवडणुकीचे उमेदवार किरण चौबे यांची ही कार होती. किरण चौबे स्वत: गाडीत होत्या. अंबरनाथ उड्डाणपुलावरून जात असताना अचानक कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या ३ ते ४ बाईकस्वारांना उडवलं. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
advertisement
या अपघातात अंबरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कार चालक आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात किरण चौबे या सुद्धा जखमी झाल्या आहे. जखमींना तातडीने ल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, पालिकेची इतकी मोठी इमारत पश्चिमेला असताना देखील टाऊन प्लॅनिंग कार्यालय अजूनही पूर्वेलाच आहे, ते कार्यालय बंद करण्यासाठी हे कमी कर्मचारी कार्यालयाात गेले होते. त्यामुळे ठेकेदारांना या कर्मचाऱ्यांचा बळी घेतल्याचा आरोप आता केला जावू लागला आहे.
दरम्यान, मृतांना ज्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी भेट दिली.
