TRENDING:

Shiv Sena UBT: ''बाहेरचा उमेदवार कशाला, स्थानिकांनी...'', ठाकरे गटाचे शिलेदार आक्रमक, बालेकिल्लाच धोक्यात!

Last Updated:

Shivsena UBT BMC Candidate: शिवसेना ठाकरे गटातही उमेदवाराच्या मुद्यावरून वाद उफाळून आला आहे. ठाकरेंना साथ देणाऱ्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी वॉर्ड बाहेरील उमेदवार कशाला असा सवाल उपस्थित केला आहे. बाहेरच्या उमेदवाराविरुद्ध राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना दुसरीकडे वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटातही उमेदवाराच्या मुद्यावरून वाद उफाळून आला आहे. ठाकरेंना साथ देणाऱ्या मतदारसंघातील शिवसैनिकांनी वॉर्ड बाहेरील उमेदवार कशाला असा सवाल उपस्थित केला आहे. बाहेरच्या उमेदवाराविरुद्ध राजीनामा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
''बाहेरचा उमेदवार कशाला, स्थानिकांनी...'', आमदाराविरोधात ठाकरे गटाचे शिलेदार आक्रमक, बालेकिल्लाच धोक्यात!
''बाहेरचा उमेदवार कशाला, स्थानिकांनी...'', आमदाराविरोधात ठाकरे गटाचे शिलेदार आक्रमक, बालेकिल्लाच धोक्यात!
advertisement

प्रभादेवीचा भाग असलेल्या मुंबई महापालिकेच्या १९४ क्रमांकाच्या वॉर्डमधील उमेदवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार सुनील शिंदे यांच्या भावाला या वॉर्डमधून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होताच प्रभादेवी परिसरातील शिवसेना उबाठा पदाधिकारी आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पक्षाच्या अंतर्गत बैठकीतच पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत, असा निर्णय घेतल्यास बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे.

advertisement

> आयात उमेदवाराला विरोध...

सूत्रांच्या माहितीनुसार, १९४ वॉर्डमधील उमेदवारी स्थानिक शिवसैनिकाला न देता ‘आयात’ उमेदवार दिला जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. “लोअर परेलचा आयात उमेदवार नको, स्थानिक आणि संघर्षातून उभा राहिलेला उमेदवार द्या,” अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून कुटुंबीयांना तिकीट दिले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

advertisement

या वॉर्डमध्ये सध्या ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशीच लढाई अपेक्षित असल्याचे मत शिवसैनिकांनी मांडले आहे. अशा परिस्थितीत बाहेरचा उमेदवार दिल्यास स्थानिक पातळीवर मोठा विरोध होईल आणि त्याचा थेट फायदा शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना होईल, असा अंदाज कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पक्षाचा परंपरागत मतदार दुरावण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

advertisement

> शिवसैनिकांचे राजीनामे?

दरम्यान, उमेदवारीवरून वाढलेल्या असंतोषामुळे काही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहिती आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली असून, हे राजीनामे मागे घ्यावेत यासाठी वरिष्ठ स्तरावरून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रभादेवी आणि लोअर परेल परिसरात पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष शांत करण्यावर सध्या भर दिला जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रात्री उशिरा झोपताय? वेळीच व्हा सावध, वाढतोय या आजारांचा धोका, Video
सर्व पहा

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटातील ही अंतर्गत नाराजी पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे या वॉर्डमधील उमेदवारीचा निर्णय नेतृत्व कशा प्रकारे घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT: ''बाहेरचा उमेदवार कशाला, स्थानिकांनी...'', ठाकरे गटाचे शिलेदार आक्रमक, बालेकिल्लाच धोक्यात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल