TRENDING:

काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण पकडला! 3 वर्षांतच जबर प्रमोशन; कोण आहेत ज्योती वाघमारे?

Last Updated:

एकनाथ शिंदेंनी केला मोठा गेम! राहुल शेवाळे आणि बड्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांतलिला रामदास, प्रतिनिधी मुंबई: जे भल्याभल्या लोकांना वाटलं ते काहीच घडलं नाही, सगळ्यांचे अंदाज चुकले आणि एकनाथ शिंदेंनी गेम फिरवला. राहुल शेवाळे, शायना एन सी सोडून नवख्या चेहऱ्याला थेट राज्यसभेसाठी संधी देण्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचा हात सोडून थेट धनुष्यबाण हाती घेतला. जे बोलणार ते करून दाखवणार हे वाक्य त्यांनी सोलापुरात प्रत्यक्षात आणून दाखवलं. अवघ्या 3 वर्षांच्या कालावधीत त्यांनी वरिष्ठांचा विश्वास जिंकला. त्यांना आज थेट राज्यसभेसाठी एन्ट्री मिळाली आहे.
News18
News18
advertisement

16 मार्च रोजी राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने चार नावांची यादी जाहीर केली आहे.भाजपकडून विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेनं आपल्याकडून ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. शिवसेना सोलापूरच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवार घोषित करण्यात आली. त्या सोलापूरमधील असून सहा भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याचं सांगितलं जातं आहे.

advertisement

ज्योती वाघामारे यांनी काँग्रेसमध्ये असताना शहराध्यक्ष म्हणून दीड वर्ष काम पाहिलं आहे. 2023 एप्रिलमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली. अभ्यासू मांडणी, आंबेडकरी चळवळीचा वैचारिक वारसा आणि उत्तम वक्तृत्व यामुळे त्या नेहमीच विरोधकांना पुरुन उरल्या. आता शिवसेनेकडून त्यांना संधी देण्यात आली आहे.

कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे

advertisement

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी

- इंग्रजी साहित्यात पीएचडी

- दहावीच्या परिक्षेत ज्योती वाघमारे यांना ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.

- बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम

- अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम

- महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

- १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभव

advertisement

पाच भाषांवर प्रभुत्व

मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व

डॉ. ज्योती वाघमारे यांचा परिचय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

- सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा चेहरा म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.

- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील श्री. नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी श्री. नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटरचे तसेच बांधकाम मजूर म्हणून काम केले.

advertisement

- चळवळीतील कामाचा पोचपावती म्हणून सोलापूरमधील नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत श्री. नागनाथ वाघमारे यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.

- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.

- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी काहीकाळ वृत्त निवेदिका म्हणून काम केलं.

- पुढे उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली.

- वालचंद महाविद्यालयात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्राध्यापिका म्हणून काही काळ काम केले.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे – शिवसेनेचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा

- मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील धडाकेबाज महिला कार्यकर्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.

- मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सक्रियपण काम करत आहेत.

- शिवसेना पक्षात ऐतिहासिक उठाव झाल्यानंतर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.

- मागील अडीच वर्षात विविध मंचांवर आणि चर्चासत्रात शिवसेना आणि माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या ऐतिहासिक उठावाबाबत सडेतोड आणि मुद्देसूद बाजू मांडत शिवसेना प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपयुक्तता सिद्ध केलेली आहे.

- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यांमध्ये केलेली भाषणं त्यांच्या वक्तृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.

- शिवसेना नेतृत्वावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत किंवा त्याहून विखारी भाषेत सडेतोड उत्तरं देणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

- महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान आणि राज्याच्या राजकारणावरील सखोल अभ्यासपूर्ण भाषण ही प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची वैशिष्ट्ये आहेत.

- सलग तीन दसरा मेळाव्यात घणाघाती भाषणातून ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.

- जनतेतला धडाकेबाज चेहरा खासदार झाल्यास सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना विस्तारासाठी फायदा होईल.

डॉ. ज्योती वाघमारे अल्प परिचय

- उच्चशिक्षित महिला (पीएचडीधारक), दलित वर्गातील महिला उमेदवार

- सोलापूर जिल्हाचे प्रतिनिधीत्व करणारी महिला कार्यकर्ता

- करोडो लाडकी बहिणींचे प्रतिनिधीत्व करणारा ग्रामीण चेहरा

- शिवसेना पक्षाच्या आक्रमक प्रवक्त्या म्हणून माध्यमांमध्ये परिचित

- विरोधकांना पुरुन उरणाऱ्या आणि शिवसेना पक्षाची सर्वच व्यासपीठांवर भक्कमपणे बाजू मांडणारे अभ्यासू व्यक्तिमत्व

- संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर अभ्यास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

- सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण पकडला! 3 वर्षांतच जबर प्रमोशन; कोण आहेत ज्योती वाघमारे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल