आंबेगाव तालुक्यातील पारगाव -जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा अरुण गिरे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र या गटातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी निश्चित झाल्याने नाराज झालेल्या अरुण गिरे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय.
advertisement
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी 2014 मध्ये वळसे पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अरुण गिरे हे आढळराव पाटलांसोबत शिंदे शिवसेनेत दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुण गिरे यांनी आढळराव पाटलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी अरुण गिरे यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करून अरुण गिरे पारगाव -जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला सामोरे जावू शकतात, असा अंदाज आहे. अरुण गिरे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाने आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
