एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या दरे गावातील निवासस्थानीच उपचार करण्यात आले. त्यांना १०४ डिग्री ताप आला होता आणि घशाला इन्फेक्शन झालं आहे. सर्दी आणि खोकल्यामुळे इन्फेक्शन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असून काळजीचे काही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेसुद्धा दरे गावात दाखल झाले. एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारपर्यंत पुन्हा मुंबईला परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदे मुंबईत परतल्यानंतर पुन्हा सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग य़ेईल.
advertisement
मंत्रिमंडळाचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. तसंच त्यांनी भाजप आमदार खासदारांसोबत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीत बावनकुळे यांनी तुमच्या मनात आहे तेच मुख्यमंत्री होतील असं सांगत फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले.
