TRENDING:

4 तासात उद्धव ठाकरेंना डबल धक्का, माजी आमदार दगडू सपकाळांनंतर आणखी एक निष्ठावंत शिलेदार फुटला

Last Updated:

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत मशालीला रामराम ठोकला आहे. यानंतर अवघ्या चार तासात उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्यातील महानगरपालिका निवडणुका अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय. रॅली काढल्या जातायत. अनेक ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जातायत. दारोदारी जाऊन मतदारांना साद घातली जात आहेत. अशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला एका दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत.
News18
News18
advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत मशालीला रामराम ठोकला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे गोरेगाव येथील निष्ठावंत माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे.

advertisement

दिलीप शिंदे हे गोरेगावमधून सलग चार वेळा नगरसेवक होते. यावेळीही ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र मनसे-ठाकरे गट युतीमुळे त्यांना संधी मिळाली नाही. ज्या वॉर्डमधून दिलीप शिंदे निवडून येत होते, तो वॉर्ड यावेळी मनसेला सोडण्यात आला. तेव्हापासून दिलीप शिंदे पक्षात नाराज होते. आता मतदानाला पाच दिवस उरले असताना दिलीप शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर दिलीप शिंदे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

advertisement

दगडू सपकाळ यांनी राजीनामा का दिला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
सर्व पहा

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतल्याचं दगडू सकपाळ म्हणाले. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळेच दगडू सकपाळ नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
4 तासात उद्धव ठाकरेंना डबल धक्का, माजी आमदार दगडू सपकाळांनंतर आणखी एक निष्ठावंत शिलेदार फुटला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल