श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाआधी राहुल गांधी यांनी संविधानावर भाषण केले होते.या भाषणात राहुल गांधी यांनी सावकरांवर भाजपला घेरलं होतं. राहुल गांधी यांच्या या भाषणाचा आधार घेत श्रीकांत शिंदे यांनी त्यांना भाषणाच्या सुरूवातीलाच संविधानावर बोलण सोडून इतर अनेक विषायांवर ते बोलून गेले,असा चिमटा काढला.
श्रीकांत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी जी तुमच्या आज्जीने इंदिरा गांधीजींनी सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. त्यामुळे इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यानंतर राहुल गांधी उभे राहिले आणि म्हणाले ही टुक माय नेम. त्यानंतर या किरेन रिजिजू यांनी जर एका खासदाराने कोणाचे नाव घेतलं तर उत्तर देण्याचा अधिकार ज्यांचे नाव घेतले गेले त्यांना आहे, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांचे भाषण संपल्यावर राहुल गांधी बोलू शकतात, असे म्हटले. त्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार चेअरकडे चालत निघाले आणि संसदेत गोंधळ सूरू झाला.
advertisement
या गदारोळानंतर राहुल गांधी यांनी उठून श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर दिले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, मी लहान असताना आजीला त्यावर प्रश्न विचारला तर त्यावर त्या म्हणाल्या, सावरकरांनी इंग्रजांशी तडजोड केली लेटर लिहील आणि माफी मागितली, असा पलटवार त्यांनी श्रीकांत शिंदेवर केला.
राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा होणारा वारंवार अपमान मान्य आहे का? असा सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदाराला केला.तसेच विरोधकांनी रिकामी पानांचे संविधान हातात घेऊन लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हने मते मिळवली, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी यावेळी केली. तसेच काँग्रेसचा सुरुवातीपासून डॉ. बाबासाहेबांना विरोध होता. काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला होता, असा हल्लाबोल श्रीकांत शिंदे यांनी केला.