जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात आजा ड्रेस कोड लागू करण्यात आलांय. सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय.सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या या निर्णयावर वाद होण्याची शक्यता.
advertisement
भारतीय परंपरेला साजेसे शोभेल असे कपडे घालावे
मंदिरात दर्शनासाठी येताना भारतीय परंपरेला साजेसे, शोभेल असेच पारंपारिक वस्त्र परिधान करून महिलांनी आणि पुरुषांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी यावं असं या पत्रकामध्ये सांगितले आहे.
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. काही कोणी मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येते. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येते. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम घालण्यात आले आहे. दक्षिण भारतातील बहुतांश मंदिरात ड्रेस कोड आहे.