मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी सिंकदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती. सिंकदर शेख हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू, रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरी अशी सिंकदरची ओळख होती. सिकंदरला अटक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याला विमानतळावरून पंजाब पोलिसांनी अटक केली होती.
सिकंदरजवळ काय काय सापडलं?
पंजाब पोलिसांनी जेव्हा सिंकदरला पकडलं, तेव्हा आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे सापडली होती. तसंच, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिकंदरच्या कुटुंबियांनी मात्र हे सगळे आरोप आरोप फेटाळून लावले होते.
advertisement
सुप्रिया सुळे यांचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन
दरम्यान, सिंकदर शेखला अटक झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सिकंदरच्याा कुटुंबीयांनी सगळे आरोप फेटाळले होते. सिंकदरच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला. सिंकदर शेख याला न्याय मिळण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. सिकंदर शेख अटकेप्रकरणी योग्य माहितीसह उत्तर देण्याचं आश्वासन पंजाब मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना दिलं होतं. भगवंत मान यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. अखेरीस अटकेच्या चौथ्या दिवशी सिकंदर शेखला जामीन मंजूर झाला आहे.
