सिंधुदुर्ग, 1 सप्टेंबर : 'प्रेम' या शब्दाला काळीमा फासणारी घटना आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. हिरण्यकेशी अशी ओळख असलेल्या आंबोलीच्या दरीत सापडलेल्या मृतदेहावरून हेच सिद्ध झालं आहे. गोवा म्हापसा येथील तरुणीचा तिच्याच प्रियकराने खून करुन मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या निसर्गरम्य असणाऱ्या परिसरात आणून टाकला होता.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपासून म्हापसा येथील कामाक्षी शंकर उदपानो (वय 21) हिचे आणि प्रकाश चुंचवाड (वय 22) यांचे प्रेम संबंध होते. मात्र, काही कारणांवरून या दोघांमधून कडाक्याचे भांडण झाले. यात प्रकाश याने कामाक्षीच्या मित्र व मैत्रिणीच्या समोर कानशिलात लगावली होती. यावरून कामाक्षी हिने या प्रेम प्रकरणातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तसे तिने 29 ऑगस्ट रोजी म्हापसा येथील पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार देऊन आरोपी प्रकाशाला समज देण्यास सांगितले. प्रकाशला घडल्या प्रकारचा प्रचंड राग आला. त्याने कामाक्षी हिला दिनांक 29 ऑगस्ट रोजी स्वतःच्या राहत्या फ्लॅटवर शेवटचे भेटण्यास बोलवले, कामाक्षी त्या ठिकाणी गेली. मात्र, प्रकाशने तिच्याशी भांडण करत तिची निर्घृण हत्या केली.
advertisement
वाचा - दिराचा पाय घसरला, भाऊ बाहेर जाताच वहिनीवर टाकला हात, पुढे जे घडलं ते..
प्रियकरानेच काढला काटा
हत्येनंतर आरोपीने मृतदेह स्वतःच्या गाडीत भरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली या पर्यटन स्थळाच्या खोल दरीत फेकून दिला. याच दरम्यान दिनांक 31 रोजी कामाक्षीचा भाऊ याने म्हापसा पोलीस ठाण्यात आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. म्हापसा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि प्रकाशला संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच प्रकाशने कामाक्षी हिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात मृतदेह फेकल्याचे कबूल केले. त्यानुसार प्रकाश याच्यावर मापसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून, पोलिसांनी अधिक तपासासाठी तसेच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी थेट सावंतवाडी गाठले. आज दुपारी प्रकाशाच्या सांगण्यावरून म्हापसा पोलीस व सिंधुदुर्ग पोलिसांनी एकत्रित आंबोली घाटात शोध मोहीम सुरू केली. आणि कामाक्षी हिचा मृतदेह या तपासादरम्यान आढळून आला. पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
