मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गालगत साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा बंगळुर येथील श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.यासोबत तिलारी येथे दरीत रक्ताने माखलेली कार देखील रेड्डी यांच्याच मालकीची असल्याचे तपासात समोर आली आहे.याचाच अर्थ कारमालक आणि खून झालेली व्यक्ती एकच असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते (कणकवली) येथे एक मृतदेह आढळला होता.त्याच दिवशी तिलारीतील दरीत रक्ताने माखलेली कार आढळून आली होती. या दोन्ही घटनांचा समांतर तपास पोलीसांकडून सुरू आहे.
advertisement
दरम्यान आता या प्रकरणात बंगळुरूमधला मृत व्यक्ती सिंधुदुर्गात काय करत होता? मृत व्यक्ती गाडीने एकटात आला होता किंवा त्याच्यासोबत कोणती व्यक्ती होती? तसेच ती व्यक्ती कोण होती?या सगळ्या दिशेने पोलिसांनी तपास सूरू केला आहे. तसेच या प्रकरणी मृताचे नातेवाईक आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही धागे दोरे मिळतायत की नाही? याचाही तपास सूरू केला आहे.त्यामुळे लवकरच या मृत्यूचे गुढ उकलण्याची शक्यता आहे. पण अशा या भयानक घटनेने सिंद्धुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
