TRENDING:

ST Bus Cancelled : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच तब्बल 230 बस फेऱ्या रद्द, कोकणवासियांचं काय होणार?

Last Updated:

गणेशोत्सव सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणची वाट धरायला सूरूवात केली आहे. या दरम्यान एसटीच्या तब्बल 230 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ST Bus Cancelled : सिंधुदुर्ग: गणेशोत्सव सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणची वाट धरायला सूरूवात केली आहे. या दरम्यान एसटीच्या तब्बल 230 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यात आता गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच या बसेस का रद्द करण्यात आल्या आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ST bus cancelled
ST bus cancelled
advertisement

सिंधुदुर्ग विभागातील एसटीच्या तब्बल 230 बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच प्रवशांना बसअभावी ताटकळत बसावं लागत आहे.त्यामुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप झाला आहे.

बस का रद्द केल्या?

मुंबईस्थित चाकरमान्यांना आणण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील 110 बसेस मुंबईला रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 230 बस फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत.यामध्ये कोल्हापूर तुळजापूर सोलापूर रत्नागिरी पुणे पणजी या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहेत.

advertisement

खरं तर चाकरमान्यांना आणण्यासाठी या बसेस पाठवल्यामुळे जिल्ह्यांतर्गत सावंतवाडी कुडाळ मालवण कणकवली या गावातील अंतर्गत गावामध्ये फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेल्या ग्रामस्थांनी आणि कोकणात पोहोचलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

तालुका वार रद्द झालेल्या फेऱ्या

सावंतवाडी 68

मालवण 30

कणकवली 66

कुडाळ 20

देवगड 16

विजयदुर्ग 17

advertisement

वेंगुर्ले 13

अशा मिळून 230 बस फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईवरून येणाऱ्या गणेश भक्ताने देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.

एसटी बस हाऊसफुल्ल

गणपतीच्या स्वागतासाठी मुंबई,ठाणे, पालघर विभागातून कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांनी एसटीला प्राधान्य दिलं आहे.त्यामुळे एसटीच्या 4479 बस गट आरक्षणासह एकूण 5103 ज्यादा बसेस आतापर्यंत भरल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST Bus Cancelled : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच तब्बल 230 बस फेऱ्या रद्द, कोकणवासियांचं काय होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल