TRENDING:

Bachchu Kadu: विखे पाटलांची गाडी फोडा अन् १ लाखाचं बक्षीस मिळवा; बच्चू कडूंची वादग्रस्त घोषणा

Last Updated:

मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विखे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले असून, त्यांनी एक वादग्रस्त घोषणा केली आहे. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचं माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल’ असे थेट आव्हान बच्चू कडू यांनी दिले आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

शेतकरी कर्ज घेतात, कर्जबाजारी होतात आणि कर्जमाफी मागतात, असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले होते. ज्यामुळे शेतकरी आणि विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर बच्चू कडू यांनी अरे मेहरबानी माना लोक तुम्हाला मारत नाहीत, आम्ही हे सहन करणार नाही' अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.

advertisement

नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाची : बच्चू कडू 

नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाची करायची असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे अशी मागणी सुद्धा फडणवीसांनी केली. फडवणीस साहेब एकीकडे कर्जमाफीची घोषणा करते हे वाचाळवीर मंत्री असे वक्तव्य करते, एवढं करुन सुद्धा लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे ही नालायकी थांबवा असे बच्चू कडू म्हणाले.

advertisement

काय म्हणाले होतं विखे पाटील? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणी कर्जमाफी मागायची या वक्तव्यामुळे विखे पाटील अडचणीत आले आहेत. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं विखे पाटील यांनी म्हटले आहे. निवडणुका आल्या कि सोसायटीचं कर्ज काढलं जातं त्यातून कोणतीही उत्पादकता होत नाही त्यामुळे कर्जबाजारी होऊन कर्जमाफी मागायची असं चक्र सुरू असल्याची सारवासारव करत विरोधकांना कवळ कर्जबाजारीपणा हा मुद्दा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात काम करतोय मात्र मी कधीही बेताल वक्तव्य करत नसल्याचंही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bachchu Kadu: विखे पाटलांची गाडी फोडा अन् १ लाखाचं बक्षीस मिळवा; बच्चू कडूंची वादग्रस्त घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल