सोलापूर - नागपूर विशेष गाड्या
सोलापूर - नागपूर गाडी क्रमांक 01029 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 वाजून 05 मिनिटानी सोलापूर रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05.10 मिनिटाला नागपूर रेल्वे स्थानकाला पोहोचेल. तर 2 ऑक्टोबर रोजी नागपूर - सोलापूर ही विशेष गाडी क्रमांक 01030 ही नागपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी 02 वाजून 30 मिनिटाला नागपूर रेल्वे स्थानकावरून सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 02 वाजून 45 मिनिटाला सोलापूरला पोहोचेल.
advertisement
तर या गाडीला थांबा कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर,कोपरगाव,मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तजापुर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या स्थानकावर थांबणार आहे. रेल्वे विभागाने होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैद्य तिकिटासह प्रवास करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केला आहे.