हुंड्यासाठी छळ आणि बेदम मारहाण
शिल्पा यांचा विवाह २०२४ मध्ये बेळगाव इथल्या उमेश विटकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर पहिले काही दिवस सगळं सुरळीत सुरू होतं, मात्र सासरच्यांनी खरे रंग दाखवायला सुरुवात केली. काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी बसता उठता टोमणे मारायला सुरुवात केली. "लग्नात नीट मानपान केला नाही" असे टोमणे मारून मानसिक त्रास दिला. इतकंच नाही तर, माहेरून एक लाख रुपये घेऊन ये आम्हाला गाडी घ्यायची आहे, अशी मागणी करत त्यांना वारंवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या छळण्यात आलं.
advertisement
"दुसरं लग्न करण्याची धमकी"
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्यानंतरही शिल्पा यांनी सासरच्यांना जुमानलं नाही. मग पुढे खरा खेळ सुरू झाला. शिल्पा यांचा पती उमेश याला दारूचे व्यसन असल्याने घरात रोज तमाशे होऊ लागले. तो दारू पिऊन घरी यायचा आणि शुल्लक कारणावरून शिल्पा यांना बेदम मारहाण करायचा. मारहाण करतानाच, "मी दुसरे लग्न करेन" अशी धमकी देऊन तो त्यांना मानसिक वेदना देत होता. अखेर १ लाख रुपयांच्या मागणीसाठी सासरच्यांनी त्यांना घरातून हाकलून दिलं.
त्रासाला कंटाळून पोलिसात धाव
सगळ्या त्रासाला कंटाळून शिल्पा यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर पोलिसांनी पती उमेश, सासू सुंदर, सासरे आनंद, नणंद लता आणि उमा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक माडे करत आहेत. आजही महाराष्ट्रात हुंड्यासाठी, मानपानासाठी अनेक तरुणींच्या जीवावर सासरचे उठण्याचे प्रमाण काही कमी झालं नाही, या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी पीडितेनं केली आहे.
