TRENDING:

68 तासांचा थरार संपला, पण यश परतलाच नाही! गंगेवाडीतील दगड खाणीत बुडून विद्यार्थ्याचा अंत

Last Updated:

पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यश खोल पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या गंगेवाडी येथील दगड खाणीतील शोधकार्याला आज रविवारी पहाटे अत्यंत विदारक अंत झाला. पोहण्यासाठी गेलेला 10 वर्षीय विद्यार्थी यश हरी हब्बू याचा मृतदेह तब्बल 68 तासांनंतर पाण्यावर तरंगताना आढळून आला. एका निष्पाप बालकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण कासेगाव परिसरावर शोककळा पसरली असून, हब्बू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
News18
News18
advertisement

यश हब्बू हा कासेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळच्या सत्रात भरत आहेत. 12 मार्च रोजी शाळा सुटल्यानंतर, यश आपल्या काही मित्रांसोबत गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगेवाडी शिवारातील एका दगड खाणीत पोहण्यासाठी गेला होता. या खाणीत 50 फुटांहून अधिक पाणी साठलेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यश खोल पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

advertisement

68 तासांनंतर  मृतदेह तरंगताना दिसला

घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस, सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. खाणीतील पाणी आणि खोलीमुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते. सलग तीन दिवस रात्रं-दिवस ही शोधमोहीम राबवण्यात आली. स्थानिक मच्छिमार आणि पोहणाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. अखेर 68 तासानंतर रविवारी पहाटे यशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

advertisement

गावावर शोककळा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबू, द्राक्षांनी मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

यशचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर कासेगावमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळाला. एक हुशार आणि खेळकर मुलगा अशा प्रकारे सोडून गेल्याने गावातील प्रत्येक घरांत हळहळ व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले पाण्याच्या शोधात अशा धोकादायक ठिकाणी जातात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
68 तासांचा थरार संपला, पण यश परतलाच नाही! गंगेवाडीतील दगड खाणीत बुडून विद्यार्थ्याचा अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल