कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 59 हजार 134 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 21 हजार 577 क्विंटल सर्वाधिक आवक अहिल्यानगर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 650 ते 1300 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 125 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Weather Alert: मार्चच्या मध्यावर धोका वाढला, महाराष्ट्रावर नवं संकट, 72 तासांसाठी अलर्ट
advertisement
लिंबूला भाव
राज्याच्या मार्केटमध्ये आज 443 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या 423 क्विंटल लिंबूस 5250 ते 6700 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लिंबूस 10 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्षाचे दर काय?
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 919 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 904 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 15000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 170 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात आवक केळीस प्रतीनुसार 1250 ते 3550 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.





