नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मोहोळमधील तमाम माझ्या महिला भगिनींचं आणि नागरिकांचे मी स्वागत करतो. आमदार यशवंत माने, राजन पाटील यांचे अभिनंदन करतो. मी तुम्हाला शब्द देतो यापुढे तुम्हाला निधीचा कमतरता भासू देणार नाही.
मिळालेल्या सत्तेचा वापर या भागातील विकास कसा करता येईल? यासाठी करा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की काहीजण माझ्यावर टीका करतात त्याचं मला काही घेणं देणं नाही. लोकांशी प्रामाणिक राहायचं लबाडी करायची नाही. स्पष्ट बोलतो त्यामुळे लोक नाराज होतात. महापुरुषांनी राज्याला एक दिशा देण्याचं काम केलं आहे. अनेक जण विचारतात या सरकारमध्ये तुम्ही कसं गेलात मी विकास करण्यासाठी या सरकारमध्ये आलो आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना आम्ही आमची विचारसरणी सोडली नाही. त्यावेळेस आम्ही शिवसैनिकांसोबत होतो. आता जरी शिंदे आणि फडणवीसांसोबत असलो तरी आमचा विचार सेक्युरवादीच आहे.
कुठलाही जात धर्म एकमेकांचा अनादर करत नाही, पण आज विषारी प्रकारची भाषा वापरली जात आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.