TRENDING:

Rugan Seva: रुग्णसेवक असावा तर असा, रुग्णांची सेवा करण्यासाठी सोडली नोकरी, मोफत करतोय काम, Video

Last Updated:

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्यप्रमाणे सोलापूर शहरातील 70 फूट रोड येथे राहणारे तरुण आशम फुलमामडी गेल्या 4 वर्षांपासून काम करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर - रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्यप्रमाणे सोलापूर शहरातील 70 फूट रोड येथे राहणारे तरुण आशम फुलमामडी गेल्या 4 वर्षांपासून काम करत आहेत. कोणताही रुग्ण उपचारासाठी वंचित राहू नये हीच धडपड रुग्णसेवक आशम फुलमामडी करत आहेत. या संदर्भात अधिक माहिती आशम फुलमामडी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement

आशम फुलमामडी रा. 70 फूट रोड सोलापूर असे तरुण एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण शिकलेल्या रुग्णसेवक तरुणाचे नाव आहे. 5 वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. आशम यांच्या मित्राच्या मुलाला हृदयामध्ये छिद्र झाले होते. आशम तेव्हा मेडिकल फिल्डमध्ये कामाला होते. तेव्हा त्यांच्या मित्रांनी आशम यांना फोन करून घडलेली घटना सांगितली.

तेव्हा आशम यांनी कामावरून येऊन मित्राच्या मुलाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडे जाऊन आर्थिक मदतीची मागणी केली. तेव्हा आशम यांनी निर्णय घेतला की आपण रुग्णसेवक बनायचे. सोलापूर शहरातील एका मेडिकलमध्ये काम करत असलेल्या आशम यांनी काम सोडून सोलापूर शहरात गेल्या चार वर्षांपासून रुग्णसेवा करत आहेत. शासकीय योजनेतून रुग्णांना उपचार मिळवून देणे, त्यांना उपचारासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करणे तसेच गरजू रुग्णांना दानशूर व्यक्तीकडून मदत मिळवून देण्याचे काम रुग्णसेवक आशम करत आहेत.

advertisement

Vrudhashram: पोटच्या मुलांनी सोडलं, पण गणेश करतात आई-वडिलांप्रमाणे सांभाळ, Video पाहून कराल कौतुक

View More

खाजगी मेडिकलमधील काम सोडून आशम यांनी स्माईल फाउंडेशन या नावाने संस्था सुरू केली आहे. या संस्थेमध्ये 11 जण काम करत आहेत. तर आतापर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून 350 ते 400 पेक्षा अधिक रुग्णांची मदत या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

सोलापूर जिल्हा सह धाराशिव, लातूर, बीड, जालना, सांगली जिल्ह्यातील रुग्णांची देखील मदत आशम फुलमामडी व त्यांच्या फाउंडेशनमार्फत केली जाते. एका मेडिकलमध्ये काम करणारा तरुण आज सोलापूर शहरात एकही रुपया न घेता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्यप्रमाणे काम करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Rugan Seva: रुग्णसेवक असावा तर असा, रुग्णांची सेवा करण्यासाठी सोडली नोकरी, मोफत करतोय काम, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल