advertisement

Vrudhashram: पोटच्या मुलांनी सोडलं, पण गणेश करतात आई-वडिलांप्रमाणे सांभाळ, Video पाहून कराल कौतुक

Last Updated:

आपल्या मुलाला आयुष्यात प्रत्येक सुख मिळावं, चांगलं शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी मिळावी यासाठी आई-वडील हे आयुष्यभर कष्ट आणि मेहनत घेत असतात. पण जेव्हा आई-वडिलांना सांभाळायची वेळ होती तेव्हा हेच मुलं त्यांना सोडून देतात किंवा वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : आपल्या मुलाला आयुष्यात प्रत्येक सुख मिळावं, चांगलं शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी मिळावी यासाठी आई-वडील हे आयुष्यभर कष्ट आणि मेहनत घेत असतात. आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देत असतात. पण जेव्हा आई-वडिलांना सांभाळायची वेळ होती तेव्हा हेच मुलं त्यांना सोडून देतात किंवा वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात. पण यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे गणेश डोणगावकर हे या निराधार वृद्धांसाठी काम करतात.
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे गणेश डोणगावकर हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. नोकरीनिमित्त ते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्थायिक झाले. गणेश डोणगावकर यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरामध्ये आधार वृद्धाश्रम नावाने एक वृद्धाश्रमाची सुरुवात केली. वृद्धाश्रमाची सुरुवात त्यांनी 2014 साली केलेली आहे. या वृद्धाश्रमामध्ये जे आजी-आजोबा आहेत ते स्वतः काहीच करू शकत नाहीत, चालू शकत नाही, फिरू शकत नाही अशा सर्व आजी-आजोबांची काळजी या ठिकाणी घेतली जाते.
advertisement
गणेश सांगतात की, हा वृद्धाश्रम सुरू करण्यामागे मला प्रेरणा मिळाली ती आमच्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांमुळे. मी शहरातील सिडको परिसरात राहत होतो. आमच्या शेजारी एक आजोबा राहत होते. त्यांचं वय झालं होतं. पण त्यांना त्यांच्या घरातून चांगली वागणूक मिळत नव्हती आणि नंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोडून दिलं. आजोबांना चांगलं राहता यासाठी मी शहरातील अनेक वृद्धाश्रमांमध्ये गेलो. पण त्या ठिकाणी त्यांना कोणीही ठेवून घेत नव्हते कारण की त्यांची मानसिक स्थिती थोडीशी ठीक नव्हती. मग मीच ठरवलं की, आपण पण या वयोवृद्धांसाठी काहीतरी करूयात.
advertisement
यासाठी मी माझ्या घरच्यांचा सल्ला घेतला. माझी पत्नी, माझी आई-वडील आणि माझ्या मुलांनी यामध्ये मला खूप साथ दिली आणि 2012 साली या वृद्धाश्रमाची स्थापना केली. वृद्धाश्रमाची देखील नोंदणी करावी लागते, शासनाकडून परवानगी घ्यावी लागते हे मला माहीत नव्हतं. त्यानंतर मी सर्व परवानगी घेतली आणि 2014 साली या वृद्धाश्रमाला शासन मान्यता मिळाली आणि सध्या या वृद्धाश्रमामध्ये 25 आजी-आजोबा आहेत.
advertisement
गणेश सांगतात की, आतापर्यंत या वृद्धाश्रमात जे 47 आजी-आजोबा होते त्यांचे निधन झालं आणि त्या सर्वांवरती मी आणि माझा मित्र मारुती, आम्ही दोघांनी अंत्यसंस्कार केलेले आहेत. तसेच अनेक आजी-आजोबांना आम्ही समजूत घालून, त्यांच्या मुलांना समजूत घालून त्यांना परत त्यांच्या घरी पाठवून दिलेले आहे.
वृद्धाश्रमामध्ये त्यांना तपासण्यासाठी शहरातील काही डॉक्टर येतात आणि ते देखील अगदी निःशुल्क या आजोबांना तपासतात, त्यांना गोळ्या वगैरे देतात. तर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून गणेश या निराधार आजी-आजोबांसाठी काम करत आहेत. ज्या मुलांनी त्यांना सांभाळलं नाही पण त्यांचा मुलगा म्हणून ते आजी-आजोबांना सांभाळ करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Vrudhashram: पोटच्या मुलांनी सोडलं, पण गणेश करतात आई-वडिलांप्रमाणे सांभाळ, Video पाहून कराल कौतुक
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement