सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकविणारी घटना समोर आली आहे. चालत्या कोणार्क एक्स्प्रेसमध्ये चढताना एका प्रवाशी तरुणाचा तोल जाऊन रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये जात असताना रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे पोलिसाने तत्परतेने धाव घेतली. तसेच त्या प्रवाशी तरुणाला फलाट आणि गॅपमध्ये जाण्यापूर्वीच बाहेर काढले. यामुळे या तरुणाचे प्राण वाचले. हा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मनोज कांबळे ( वय-32, रा. करमाळा) असे जीव वाचलेल्या तरुणाचे नाव आहे.
advertisement
नेमकं काय घडलं -
बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोलापूर रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस हे बंदोबस्तासाठी तैनात होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कोणार्क एक्स्प्रेस ही फलाट क्रमांक एकवर आली. ही गाडी जात असतानाचा पाहून चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना मनोज कांबळे यांचा पाय घसरला. ही घटना तेथे तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी पाहिली आणि लगेच त्याला ओढून बाहेर काढले.
शिवाय यावेळी गाडीतील गार्डने तत्काळ ब्रेक मारून गाडी थांबविली. या घटनेमुळे मनोज खूप घाबरलेला होता. त्यानंतर त्याला शांत करून विचारपूस केली. त्याला पाणी दिला आणि सुखरूप तो पुढच्या प्रवासाला गेला. आपले प्राण बचावल्याने प्रवाशी मनोज कांबळे याने रेल्वे पोलिसांचे दोन्ही हात जोडून आभार व्यक्त केले.
hand pump : घराशेजारच्या हातपंपाची माहिती मिळणार फक्त एका क्लिकवर, नेमकं काय कराल?
या मदतकार्यात सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. जे. गुरव, पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, सहायक पोलीस फौजदार प्रकाश कांबळे, पोलीस हवालदार साबीर जरतार, परमेश्वर खरात, प्रमोद सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार राठोड, संदिप राठोड, रुपाली सोलंकर यांनी मोलाची कामगिरी बजावली.