पण पूजा गायकवाडच्या अटकेनंतर गोविंद बर्गे यांच्या मृत्यूबाबत विविध संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, बर्गे यांच्या भाच्याने खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मामाला फसवण्यात आलं. राजकीय लोकांनीच कट रचून मामाची पूजा गायकवाडसोबत ओळख करून दिली. ही आत्महत्या नाही, तर हत्याच आहे, असा दावा बर्गे यांच्या भाच्याने केला आहे.
advertisement
गोविंद बर्गे यांचा भाच्याने एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं की, माझा मामा हा निर्व्यसनी होता आणि त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते. माझ्या मामाकडे कधी बंदूक नव्हती. हा काहीतरी मोठा कट असून माझ्या मामाला फसवण्यात आले. मुळात म्हणजे मामा हा मागील सहा महिन्यांपासून प्रचंड तणावात होता. माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख राजकीय लोकांनीच करून दिली होती. पण आता वेगळंच चित्र दाखवलं जात आहे.
सध्या आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्याने म्हटले. पुढे बोलताना गोविंद बर्गे यांचा भाचा म्हणाला की, माझा मामा हा निर्व्यसनी होता. त्याच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या. आता गोविंद बर्गे यांच्या भाच्याने केलेल्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांकडून असेही सांगितले जात आहे की, ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे. गोविंद कधी काठीहीसोबत ठेवत नव्हता. मग बंदूक कशी आली, हा देखील प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला.
गोविंद बर्गे प्रकरणात कला केंद्रातील नर्तकीवर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय. मागील दीड वर्षांपासून गोविंद आणि पूजा संपर्कात होते. यादरम्यानच्या काळात गोविंद याने पूजाला महागड्या वस्तू दिल्या होत्या. मात्र, पूजाला गेवराईतील बंगला आपल्या नावे करून हवा होता, असाही आरोप केला जात आहे.