गोविंद बर्गे यांचा सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात त्याच्यांच कारमध्ये मृतदेह सापडला होता. त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. तर त्यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. धक्कादायक म्हणजे ही घटना नर्तकी पूजा गायकवाडच्या घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत घडली होती. त्यावरून आता बर्गे यांच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा केला आहे.
advertisement
फिर्यादीत काय म्हटलं ?
मयत बर्गे यांच्या आत्महत्येनंतर लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत ‘गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख 2024 मध्ये तुळजाभवानी कला केंद्र, पारगाव येथे झाल्याचं त्यांनी सांगितलं. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतरच पूजाने वारंवार गोविंदकडे पैशांची मागणी करत त्याला मानसिक त्रास दिला.
दीड वर्षांच्या कालावधीत बर्गेकडून पूजाने आयफोन आणि महागडे सोन्याचे दागिने, बुलेट मोटारसायकल, सोने-नाणी, प्लॉट, नातेवाइकांच्या नावे शेतजमीन देखील करून घेतली. प्लॉट देखील घेतला. यानंतर तिने गेवराईत बांधलेले नवीन घर नावावर यासाठी तगादा लावला. पण बर्गे झुकत नाही म्हटल्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटलं आहे. पूजाला अटक झाली असून आता तिची चौकशी सुरू आहे.